Articles

औषधी कल्पांच्या फलश्रुतीचे अध्ययन लोहासवम् (भाग ३)

lohasavaलोहासवाचा मुख्य अधिकार असलेल्या पाण्डू रोगामधील लोहासवाचे कार्य व अग्निवृध्दिकर कार्य या संबंधी विस्तृत माहिती मागील दोन भागांमध्ये बघितल्यानंतर ह्या भागात आपण लोहासवाच्या फलश्रुतीतील इतर व्याधींमध्ये ते कसे काम करते हे बघणार आहोत. औषधाच्या फलश्रुतीच्या अध्ययनाच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली ती अशी की लोहासवाचा व नवायस लोहाचा पाठ अगदी सारखा आहे, दोन्ही कल्पांमध्ये एकसारखीच घटक द्रव्ये आहेत. फक्त या दोन्ही कल्पांत लोहाच्या प्रमाणात फरक आहे नवायस लोहात सर्वांच्या समभाग (सर्व नऊ द्रव्ये एक एक भाग व लोह नऊ भाग म्हणूनच त्याचे नाव नवायस असे आहे) तर लोहासवात लोहासह सर्व द्रव्ये चार चार पल आहेत. अधिक वाचा…


रुग्नानुभव लिखाणासाठी मार्गदर्शक सूत्रे – ६

referenceद्वितीय लेखात आपण रेफरन्स देण्याच्या पद्धतींचा उल्लेख केला होता आणि त्याच वेळी मी लिहिले होते की, त्याबद्दल पुन्हा कधीतरी पाहू. पाचव्या लेखात प्रस्तावना कशी असावी ते पाहिले आणि उदाहरण म्हणून एका पबमेड आर्टिकलची प्रस्तावना देखील दिली होती. त्याच सोबत त्या प्रस्तावनेमध्ये वापरलेले रेफरन्स देखील दिले होते. आज आपण रेफरन्स बद्दल माहिती पाहणार आहोत. अधिक वाचा…


ओज – स्वास्थपूर्ण दीर्घायुष्याची गुरुकिल्ली

OJ दीर्घ आयुष्य आणि तेही स्वास्थ्यपूर्ण हवे असेल तर निश्चितच ओज या भावपदार्थाला दुर्लक्षून चालणार नाही याची कल्पना आपणास ओजाची कार्य पाहिल्यानंतर निश्चितच येते. हा दीर्घयुष्य, स्वास्थ्य आणि ओज यांचा संबंध आपण दोन टप्प्यात पाहणार आहोत. १) गर्भधारणा – गर्भावस्थेतील काळ आणि ओज व २) जन्मोत्तर – काल आणि ओज अधिक वाचा…


आयुर्वेदातील संशोधनाची गरज व दिशा – एक चिंतन

आक्रमणानंतर हेतुपूर्वक खच्चीकरण करण्यात आले. संस्कृत, व्याकरण, पदार्थविज्ञान, तर्कशास्त्र, सांख्य, वैशेषिक दर्शन यांचा अभ्यास हा आयुर्वेद शास्त्राच्या आकलनासाठी आवश्यक असलेला पायाच ढासळला. त्यामुळे आज पंख छाटलेल्या पक्षासारखी, आयुर्वेद शास्त्रातील बहुतेक विद्यार्थ्यांची स्थिती आहे. तरीही काही परंपरा अजूनही आयुर्वेदातील शिक्षण संशोधनाची एक परंपरा होती. गुरुकुल पद्धतीने, गुरुंच्या सान्निध्यात राहून आयुर्वेदाची तात्त्विक आणि व्यावहारिक बाजू समजून घेणे आणि त्याचे परिशीलन करत राहणे, ही आयुर्वेद शिक्षणाची पद्धत होती. या परंपरेचे इंग्रजांच्या दमदारपणे, शास्त्र समजून घेऊन, नवनवे प्रयोग करताना संपूर्ण देशभर आढळतात. अधिक वाचा…


शास्त्र-व्यवहार, सर्वांग कुष्ठ – जीर्ण, लीनदोष – आयुर्वेदीय निदान

पुरुष रुग्ण २५ वर्ष. अविवाहित. सिव्हील इंजिनीयर. २ वर्षापासून उदर, पृष्ठ, हस्त, पाद, शिरो सर्वांग त्वक दुष्टी, रजोविमुचन होते, स्राव नाही, रौक्ष्य, कंडूयन यासाठी allopathy चिकित्सा घेतली. Allopathy चे निदान Psoriasis vulgaris असे होते. यासाठी allopathy चिकित्सा व steroids घेतले. पण त्याने उपशम नाही. रूग्णाने आयुर्वेदिक (सिद्धसाधित) वैद्याकडे चिकित्सा घेतली. तेथे वमन पंचकर्म व्यापद झाले. रूग्ण स्नेहपाना दरम्यान वर्धमान मात्रेत स्नेहपान केल्यावरक्षुधाबोध होण्यापूर्वी आहार सेवन करत असे. तसेच building construction site वर काम करत असे. पश्चात् सम्यक स्नेहपान नसताना वमन केले. वमनही हीन शुद्धी असलेले झाले. यासारख्या हेतूंमुळे दोष आणखीवाढले व शाखेत अधिकच लीन झाले. अधिक वाचा…