नवीन लेख
स्वप्नमीमांसा व रुग्णानुभव
आपणा सगळ्यांनीच निद्रा अवस्थेत असताना स्वप्नदर्शन होणे हा अनुभव घेतलेला आहे. मात्र काहीवेळा काही व्यक्तीत ही स्वप्न अतिप्रमाणात व मानसिक अस्वस्थता निर्माण करणारीही असतात. अगदी इतकी की झोप न झाल्याचा अनुभव देणारी असतात. अशी स्वप्न जर वारंवार उद्भवत असतील तर मात्र रुग्ण व्यथित होतो व वैद्याकडे चिकित्सा करुन घेण्यासाठी उपस्थित होतो. अशावेळी आयुर्वेदीय दृष्टीकोनातून त्यासाठी चिकित्सा देण्याचा योग आलाच तर केली जाणारी चिकित्सा फलद्रुप व्हावी ह्यासाठी आपणास अगोदर स्वप्न ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे.
वेदान्त दर्शनाप्रमाणे मनुष्याच्या शरीर, मन व आत्म्यासंबंधी चार अवस्था संभवतात- 1)जागृत 2)सुषुप्ति 3)स्वप्न 4)तुर्या अधिक वाचा…
पुरुष वंध्यत्व चिकित्सानुभव
प्र. आपण किती वर्षांपासून आयुर्वेदिक व्यवसाय`करत आहात? या कालावधीत किती पुरुष वंध्यत्वाच्या रुग्णांना चिकित्सा दिली ?
– मला जवळपास ३७ वर्षे झाली मी शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा करीत आहे. पुरुष वंध्यत्वाच्या केसेस …. वंध्यत्वाच्या मानाने तेवढ्या समोर येत नाहीत असे दिसत असले तरी आजपर्यंत शेकड्याच्या घरातच मी अनेक पुरुष वंध्यत्वाच्या रुग्णांना चिकित्सा दिलेली आहे.
पुरुष वंध्यत्वाच्या रुग्णामध्ये वंध्यत्व आहे का षंढत्व हे लक्षात घेणे महत्वाचे असते. १) वंध्यत्व म्हणजे संभोगक्षमता प्राकृत असूनही पुरुष वीर्यामध्ये विकृती असल्याने संतानोत्पत्ती होत नाही. २) षढत्व किंवा …….. म्हणजे बीज प्राकृत असूनही जननेंद्रियाच्या हर्ष हा धर्म अल्पांशाने किंवा पूर्णांशाने नष्ट झाल्यामुळे संभोगक्षमता कमी होणे
अधिक वाचा…
अग्नि विचार
आयुर्वेद शास्त्रानुसार सेवन केलेल्या अन्नाचे पचन, उत्पन्न आहाररसाचे शरीरातील वहन व त्यापासून होणारे धातूंचे पोषण या तीन प्रधान घटना अग्नि, व्यान वायु आणि धातुवह स्त्रोतसांची अविकृत अवस्था यांच्यावर अवलंबून आहेत. यापैकी सेवन केलेल्या आहाराचे पचन करणारा म्हणून अग्नि हा विशिष्ट व महत्वपूर्ण घटक आहे.
आहार हा जरी शारीरिक धातूंचा उपचय वाढवणारा, ओज, बल, प्रभा, उत्साह, शरीर उष्मा यांचा व प्राण इ. वायु प्रकारांचा व आरोग्याचा पोषक म्हणून संबोधलेला असला तरीही वस्तुस्थिती अशी आहे की, या सगळयांच्या निर्मिती व पोषणामध्ये अग्नि हेच प्रधान कारण आहे. आहाराचा अग्निद्वारा पाक झाल्यावरच हे सर्व लाभ शरीराला प्राप्त होतात. अधिक वाचा…
Online Books Shop
-
रुग्णानुभव
₹120.00 Add to cart -
औषधीकरण
₹120.00 Add to cart -
पंचकर्म
₹120.00 Add to cart -
चिकित्सा नवनीत
₹300.00 Add to cart -
स्वास्थ्याच्या पाऊलखुणा
₹150.00 Add to cart -
मलोषधी (हिंदी)
₹60.00 Add to cart -
क्षीणदोष व्याधी चिकित्सा
₹300.00 Add to cart -
अशा कथा असे बोध
₹130.00 Add to cart -
मधुसंचय
₹160.00 Add to cart -
विदेशी ते स्वदेशी जगभरातील आरोग्यदायी औषधी भाज्या व फळे
₹180.00 Add to cart -
Maharshi Annasaheb Patwardhan
₹300.00 Read more