नवीन लेख

स्तंभित दोष – विवेचन

erectile-dysfunctionआयुर्वेद शास्त्रात प्रत्येक संकल्पनेचा प्राकृत तथा विकृत असा दोन्ही अर्थाने विचार केला जातो. उदा. दोषवृद्धीकर हेतू, याचा आपण अपथ्यात समावेश करून त्याचा त्याग करावयास सांगतो. त्याचप्रमाणे दोषक्षयावस्थेत सेवन करून दोषसाम्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. याचप्रकारे स्तंभनाचे आपण खालील शक्यतांच्या आधारे विचार करू शकतो.
*चिकित्साकर्म – स्तंभन कर्म * लक्षणस्वरूप-स्तंभ *दोषावस्था – स्तंभित दोष स्तंभन कर्माचा समावेश षडोपक्रमात करण्यात आला आहे. स्तंभन कर्माची जी व्याख्या करण्यात आली आहे ती अशी स्तंभन§ स्तंभयति यत् गतिमत्न§ चल§ ध्रुवम l च.सू. २२ गतिमान शरीरघटकाची गतिहानी करण्याचे कार्य स्तंभनद्रव्य करतात व या कर्माला स्तंभनकर्म असे म्हणतात. या सिद्धांताचा उपयोग हा ज्या व्याधीमध्ये शरीरपयोगी घटक हे शरीराबाहेर जाऊ लागतात अशा अवस्थेत साम – निराम अवस्थेचा विचार करून स्तंभन कर्म करून चिकित्सा करण्यासाठी होतो. स्तंभनकर्म हे आत्ययिक अवस्थेत करावयाचे कर्म आहे. उदा. रक्तपित्त, रक्तप्रदर निराम-अतिसार, दग्ध, छर्दी, विषचिकित्सा इ. अधिक वाचा…


पुरुष शुक्राणू निगडित अपत्य असंभव समस्या

male-spermगर्भधारणेमध्ये स्रीप्रमाणेच पुरूषाचा सहभाग असतो. स्त्रीमध्ये गर्भधारणा होण्यासाठी पुरष – शुक्राणू (शुक्रजंतु ) व स्त्रीबीज यांचे मिलन होणे आवश्यक असते. प्राथमिक तपासणीत प्रथम पुरुषाच्या वीर्याची तपासणी केल्यास पुरुषाच्या -१. वीर्याची प्रमाण (), २. शुक्राणूंची संख्या () ३.शुक्राणूंची गतिशीलता () ४.वीर्याचे घनत्व (), ५.शुक्राणूंचा आकार(), ६.शुक्राणूंची स्त्रीच्या गर्भाशयात सक्षम अवस्थेमध्ये राहण्याची कार्यक्षमता टिकून राहण्याचे सामर्थ्य या सर्व गोष्टींची कल्पना येते. त्याचप्रमाणे रक्ततपासणी केल्यास पुरुषाच्या हार्मोन्सच्या संतुलनाची कल्पना येते. अशा विविध पध्द्तीचा वापर करून प्रजनननिगडीत समस्या सोडवण्यास मदत होते. अपत्य असंभव समस्येमध्ये स्त्रीदेहाच्या वैशिष्ट्यांप्रमाणेच पुरुषदेहाची वैशिष्ट्येसुद्धा कारणीभूत असू शकतात. अधिक वाचा…


Online Books Shop

subscription

Subscription Details

1 Year – 500Rs
3 Years – 1200 Rs.
5 Years – 2000 Rs.
Per Issue – 50 Rs.

online-book-purchase
special patrika

Video Gallery

Ayurved Video Gallery