नवीन लेख

पुरुष वंध्यत्व – एक रुग्णानुभव (वैद्य महेश ठाकूर)

male infertility जो वैद्य रोग नीट जाणून न घेता चिकित्सा सुरू करतो, तो औषधांचा उत्तम ज्ञाता असला तरी त्याला चिमित्सेत यश यद्च्छेने मिळते. अर्थात औषघांचे चांगले ज्ञान आहे पण व्याधीच नीट समजला नसेल तर उत्तमोत्तम औषधे वापरुनही चिकित्सेत यश मिळेलच याची खात्री नसते. म्हणूनच चितित्सेत यश निश्चिती हवी असेल तर वैद्याने रोगाचा साकल्याने अभ्यास करूनच चिकित्सा सुरू करावी. रुग्णाचा व व्याधीचा सखोल इतिहास, अनेकविध हेतू, त्यांचा दोष-धातु-मल-स्त्रोतसे आदिंवरील परिणाम, छोषांची गति, स्थानांतरण-स्थानसंश्रय, दोष-दूष्यांची संमूर्च्छना अशा अनेक पैलूंचे बारकाईने आकलन व विश्लेषण करून मगच चिकित्सेचा protocol ठरवावा आणि त्यानुसार कर्माची व औषंधांची योजना केल्यास यश सहजसुलभ मिळते. चरकाचार्यांचा वरील सूत्राचा यथार्थ प्रत्यय देणारा हा एक रुग्णानुभव. अधिक वाचा…


अग्नि विचार

agani vicharआयुर्वेद शास्त्रानुसार सेवन केलेल्या अन्नाचे पचन, उत्पन्न आहाररसाचे शरीरातील वहन व त्यापासून होणारे धातूंचे पोषण या तीन प्रधान घटना अग्नि, व्यान वायु आणि धातुवह स्त्रोतसांची अविकृत अवस्था यांच्यावर अवलंबून आहेत. यापैकी सेवन केलेल्या आहाराचे पचन करणारा म्हणून अग्नि हा विशिष्ट व महत्वपूर्ण घटक आहे.

आहार हा जरी शारीरिक धातूंचा उपचय वाढवणारा, ओज, बल, प्रभा, उत्साह, शरीर उष्मा यांचा व प्राण इ. वायु प्रकारांचा व आरोग्याचा पोषक म्हणून संबोधलेला असला तरीही वस्तुस्थिती अशी आहे की, या सगळयांच्या निर्मिती व पोषणामध्ये अग्नि हेच प्रधान कारण आहे. आहाराचा अग्निद्वारा पाक झाल्यावरच हे सर्व लाभ शरीराला प्राप्त होतात. अधिक वाचा…


Online Books Shop

subscription

Subscription Details

1 Year – 500Rs
3 Years – 1200 Rs.
5 Years – 2000 Rs.
Per Issue – 50 Rs.

online-book-purchase
special patrika

Video Gallery

Ayurved Video Gallery